चाकूचा धाक दाखवून पैसे हिसकाविले ; गुन्हा दाखल

 

भुसावळ, प्रतिनिधी । शहरातील दीनदयाल नगर ,फकीर गल्ली मस्जिदच्या मागे फिर्यादी रिक्षा कव्हरची मजुरी देण्यासाठी जात असतांना तीन जणांनी चाकूचा धाक दाखवून पैसे हिसकाविल्याचा प्रकार दि. २१ नोव्हेंबर रोजी रात्री घडला असून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी अनिल हनुमानसिंग ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि २१ नोहेंबर रोजी रात्री ८.०० वाजेच्या सुमारास फिर्यादी रिक्षाचे सीट कव्हरची ४ हजार ९०० रुपये मजुरी देण्यासाठी फकीर गल्ली गिरीश किराणा समोर मोटरसायकल लावून जात असतांना आरोपी अशोक कोळी उर्फे भाचा पूर्ण नाव माहीत नाही, जावेद उर्फ पोटली पूर्ण नाव माहीत नाही. यातील एका आरोपीने हाताने तोंड दाबून दुसऱ्या हाताने गळ्यावर चाकूूसारखे हत्यार लावून आरोपी जावेद उर्फ पोटली याने फिर्यादीच्या पॅन्टच्या खिच्यातून ४ हजार ९०० रुपये जबरदस्तीने हिसकावून खाली पाडून त्याचे सोबत एक अनोळखी इसम असे बोळीतून पैसे घेऊन पळून गेले म्हणून भाग-५ गुरुन ०९४४ भा.द.वि कलम ३९२, ३४ प्रमाणे दिनांक २१ नोव्हेंबर २०२० रात्री १.३५ वाजेला बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सपोनि कृष्णा भोये करीत आहे.

Protected Content