चर्मकार समाज बांधवांना तात्काळ नुकसान भरपाई द्या

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स प्रतिनिधी | पाचोरा परिसरात दि. ८ जुलै २०२२ झालेल्या अतिवृष्टीमुळे चर्मकार समाजबांधवांच्या घरांमध्ये पाणी शिरून अतोनात नुकसान झालेलं आहे. या नुकसानग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

 

पाचोरा परिसरात दि. ८ जुलै २०२२ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाच्या पुराने २५ चर्मकार समाज बांधवांच्या घरांमध्ये पाणी शिरुन संसारोपयोगी वस्तुंचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी गुरुवार  दि. १ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकाऱ्यांनी तहसिलदार कैलास चावडे यांच्याकडे केली. याप्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुका अध्यक्ष गोवर्धन देवचंद जाधव, चर्मकार महासंघाचे जिल्हा कर्मचारी आघाडी बी. बी. मोरे, जिल्हा सदस्य तुकाराम गव्हाळे, रमेश सुरवाडे,आर. पी. आय.चे तालुकाध्यक्ष विनोद अहिरे, सह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

चर्मकार समाज बांधवांच्या २५ घरातील नुकसान झालेले पूरग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी या विषयावर चर्चा करतांना तहसिलदार कैलास चावडे यांनी सकारात्मक आश्वासन दिले. यावेळी तहसिलदार कैलास चावडे यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. या कामगिरीबद्दल राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे त्यांचा सत्कार देखील करण्यात आला. चर्मकार समाजाला कुठलीही अडचण आल्यास मी सतत शासनातर्फे कोणतेही अनुदान किंवा कोणत्या योजना आल्यास मी परिपूर्ण सहकार्य करेल अशी ग्वाही यावेळी तहसिलदार कैलास चावडे यांनी देत सगळ्यांचे आभार व्यक्त केले.

 

Protected Content