चंद्रशेखर बावनकुळे यांचा असाही साधेपणा : टॉवर चौकात घेतला नारळ पाणीचा आस्वाद

खामगाव, प्रतिनिधी ।भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे खामगाव येथे आले असता त्यांनी सामान्य नागरिकाप्रमाणे टॉवर चौकात हात गाडीवरील नारळ पाण्याचा आस्वाद घेतल्याने सर्वत्र त्यांच्या साधेपणाची चर्चा रंगली होती.  

 

भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे खामगाव येथे ओबीसी आरक्षणासंबंधी पत्रकार परिषद व जिल्हा बैठकीनिमीत्य़ आले असता कार्यक्रम संपल्यानंतर ते परत जात असतांना त्यांना टॉवर चौक येथे नारळ पाणीची गाडी दिसली. त्यांनी नारळ पाणी पिण्याबाबत इच्छा प्रकट केली व आमदार ॲड. आकाश फुंडकर यांच्या समवेत येथील निलेश खरे यांची नारळ पाणी गाडीवर जाऊन नारळ पाणीचा आस्वाद घेतला. निलेश खरे यांच्या हातगाडीवरील नारळ पाणी पिऊन मात्र उपरोक्त़ भाजपा नेत्यांच्या चेह-यावर तृष्णा शमल्याचा आनंद दिसून येत होता.यावेळी माजी आमदार विजयराज शिंदे, गजाननराव देशमुख, सचीन देशमुख, शरदचंद्र गायकी, संजय  शिनगारे, संतोष देशमुख, तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, पवन गरड, आदीची उपस्थिती होती.  हा सर्व प्रकार पाहणा-या नागरीकांनी भाजपा नेत्यांच्या या साधेपणाबददल कौतुक व्यक्त़ केले.  कारण माजी मंत्री व भाजपाचे प्रदेश सरचिणीस चंद्रशेखर बावनकुळे, आमदार ॲड. आकाश फुंडकर हे कोणताही बडेजावपणा न करता सामान्य़ नागरीकांप्रमाणे रस्त्यावरील हात गाडीवर नारळ पाणीचा आस्वाद घेण हे आजकालच्या जगात खरच नवलाईच आहे.

 

 

 

Protected Content