Home अर्थ चंद्रपूर जिल्हा बँकेत खातेदारांनी जमा केलेले दीड कोटी रोखपालाने हडपले

चंद्रपूर जिल्हा बँकेत खातेदारांनी जमा केलेले दीड कोटी रोखपालाने हडपले


 

चंद्रपूर : वृत्तसंस्था । चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चंद्रपूर शहरातील शाखेत खातेदारांनी जमा केलेले दीड कोटी रोखपालाने हडपले आहेत  अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. आता ग्राहकांमध्ये खळबळ उडाली असून तपास सुरू आहे.

 

हा रोखपाल जिल्हा परिषद चंद्रपूर समोर असलेल्या बँक शाखेत गेल्या २ वर्षांपासून कार्यरत आहे. अपहाराचा हा प्रकार अनेक महिन्यांपासून सुरू होता. बँकेशी संलग्न एका सहकारी सोसायटीने या शाखेत भरायला दिलेली मोठी रक्कम खात्यात जमा न झाल्याने घोटाळ्याचे हे बिंग फुटले. बँकेच्या पथकाने या शाखेत चौकशी जारी ठेवली असून अंतर्गत चौकशी सुरू आहे पोलिसात तक्रार देण्यासाठी याची व्याप्ती पाहिली जात आहे.

 

 

याच पध्दतीने किती ग्राहकांना फसवले गेले याचा तपशील चौकशीत पुढे येणार आहे. सुमारे ४ महिन्यापूर्वी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांना भ्रष्टाचार प्रकरणात चक्क तुरुंगाची हवा खावी लागली होती आणि त्यांना दूर करत नवी सत्ता विराजमान झाली आता नव्या कारभाऱ्यांच्या नाकाखाली कोट्यवधींचा अपहार झाल्याने बँकेची पुरती बदनामी झाली आहे.

 

या घोटाळ्यामुळे ग्राहकांना त्यांचे पैसे सुरक्षित की बुडाले अशी शंका आहे. तपास करत असून ग्राहकांच्या हिताचा विचार केला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. ग्राहकांनीही बँकेच्या संबंधी आपली सगळी माहिती आणि पैसे योग्यरित्या भरले जात आहेत की नाही याची तपासणा करणं महत्त्वाचं असल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली आहे.


Protected Content

Play sound