चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपद सोडावे-पदाधिकार्‍यांची मागणी

कोल्हापूर । विधानपरिषदेतील पक्षाच्या पराभवानंतर चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात सूर उमटू लागला असून त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी कोल्हापूरातील भाजपच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आता पक्षातूनच करण्यात आली आहे. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा, हातकणंगलेचे माजी तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांनी चंद्रकांतदादांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनीही शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक गांभीर्याने घेतली नव्हती. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला, असा आरोप या पदाधिकार्‍यांनी केला आहे. त्यामुळे यावर चंद्रकांत पाटील काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, त्यासोबत कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजीतराजे घाटगे यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी या नेत्यांनी केली आहे.

Protected Content