जळगाव प्रतिनिधी । आव्हाणे शिवारातील चंदू आण्णानगर परिसरातून तरूणाची १५ हजार रूपये किंमतीचा दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना बुधवार ५ जानेवारी उघडकीला आली आहे. याप्रकरणी गुरूवारी ६ जानेवारी रोजी सायंकाळी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, विश्वनाथ श्रावण कोंडाळकर (वय-३५) रा. आव्हाणे शिवार, चंदू आण्णा नगर जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. दुध व्यवसाय करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे (एमएच १९ सीटी ५५७) क्रमांकाची दुचाकी आहे. मंगळवारी ४ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता त्यांनी त्यांची दुचाकी घराजवळ पार्किंग करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेल्याचे बुधवारी ५ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजता उघडकीला आले. परिसरात दुचाकीचा शोध घेतला परंतू आढळून आली नाही. अखेर त्यांनी गुरूवारी ६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाई उमेश ठाकूर करीत आहे.