Home Cities यावल घ. का. विद्यालयातून तेजल पाटील प्रथम

घ. का. विद्यालयातून तेजल पाटील प्रथम

0
40

फैजपूर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील आमोदे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित घनश्याम काशीराम विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९५.१२ % लागला असून विद्यालयातून तेजल कैलास पाटील विद्यालयातून सर्वप्रथमआली आहे.

 

तेजल कैलास पाटील हिने ९३.६० % गुण मिळून प्रथम क्रमांक पटकवला. तर द्वितीय क्रमांक योगिता युवराज सरोदे ९१.६०, तृतीय हेमांगी प्रमोद वाघुळदे ९१.२० गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विनायक पाटील, चिटणीस प्रा. उमाकांत पाटील, चेअरमन ललित महाजन, सदस्य नामदेव पाटील, सुभाष महाजन, वैभव चौधरी, मुख्याध्यापक एस. बी. बोठे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते


Protected Content

Play sound