चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील घोडेगाव येथील रिक्षाचालकाला घर बांधण्याच्या कारणावरून चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील घोडेगाव येथील वाल्मीक बाबुराव महाले (वय-३९) ह.मु. मुंबई हे मुंबई येथे रिक्षा चालक म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान महाले हे ११ ऑक्टोबर रोजी आपल्या घरासमोर बसलेले असताना तेवढ्यात गोरख नामदेव महाले, अरूण गोरख महाले, सुनील गोरख महाले व किरण गोरख महाले सर्व रा. घोडेगाव ता. चाळीसगाव हे त्याठिकाणी आले. आणि तु मुंबई येथे वास्तव्यास असून इथे का घर बांधत आहे? इथे घर बांधायचा नाही. असे बोलून लागलीच सुनील गोरख महाले हा पाठीमागून येवून वाल्मीक बाबुराव महाले याच्या डोळ्यात मिर्ची पावडर टाकून अरूण गोरख महाले यांनी त्याच्या हातातील फावडीचा दांडा व काठी घेऊन चौघांनी जबर मारहाण केली. व तु इथे राहिला तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देखील महाले यांना देण्यात आली. या वादात वाल्मीक बाबुराव महाले यांना गंभीर दुखापत झाली. वाल्मीक बाबुराव महाले यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात भादवी कलम- ३२४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे वरील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास नितीन अमोदकर हे करीत आहेत.