पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील घुसर्डी बु” येथे अनाधिकृतपणे घरात प्रवेश करुन जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याचा प्रकार घडला असुन येथील ८ जणांविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घुसर्डी बु” ता. पाचोरा येथील नामदेव देवचंद सोनवणे यांचे घरासमोर गावातील काही इसमांनी शेकोटी पेटवली असता नामदेव सोनवणे यांनी संबंधितांना माझ्या घरासमोर शेकोटी करु नये अशी विनंती केली असता त्याचा राग येवुन वसंत राजेंद्र पाटील, वामन शामजी निकुंभ, सुधाकर मुरलीधर जाधव, मंजुळाबाई मुरलीधर जाधव, गुरुदेव मुरलीधर जाधव, शितल गुरुदेव जाधव, लताबाई सुधाकर जाधव, शोभाबाई मुरलीधर जाधव (सर्व रा. घुसर्डी बु” ता. पाचोरा) यांनी नामदेव सोनवणे यांच्या घरात अनाधिकृतपणे प्रवेश करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ करून तुम्हाला गावात राहु देणार नाही. अशी धमकी दिल्याने नामदेव सोनवणे यांनी ८ जणांविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास पोलिस उपअधीक्षक भारत काकडे हे करत आहे.