जळगाव प्रतिनिधी । शहरातील घाणेकर चौकात दोन जणांचा मोबाईल चोरून नेल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला. शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे.
शनीपेठ पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, युवराज शालीग्राम पवार (वय-५१) रा. आशाबाबा नगर आणि त्यांचे सहकारी रहेमोद्दीन शेख युसुफ (वय-४०) रा. पोलीस स्टेशनमागे नशिराबाद ता.जि.जळगाव हे सोमवारी ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास शहरातील घाणेकर चौकातील ओक मंगल कार्यालयाजवळ बसले होते. एक अज्ञात चोरट्याने दोघा ४६ हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल लंपास केल्याचे उघडकीस आले. युवराज पवार यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच शनीपेठ पोलीसांनी संशयित आरोपी चिचा (पुर्ण नाव माहिती नाही) याला अटक केली आहे. पुढील तपास पोहेकॉ परिष जाधव करीत आहे.