घरोघरी ईद उल अजहाची नमाज व दुआ

 

जळगाव, प्रतिनिधी । शनीवार एक ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतात ईद उल अजहा ची नमाज घरो घरी अदा करण्यात आली त्या अनुसार जळगाव मध्ये सुद्धा ती पार पडली. सालार नगर मधील अली मेंशन येथे सुद्धा मुस्लिम ईदगाह ट्रस्ट चे मानद सचिव फारूक शेख यांच्या घरी नमाज अदा करून विश्व मध्ये कोरोना आजारा चे उच्चाटन कर,आमच्या भारतीयांचे आरोग्य चांगले ठेव व विश्वात शांती नांदो अशी प्रार्थना करण्यात आली. या वेळी फारूक शेख, ताहेर शेख,आमिर शेख, अताउल्लाह खान,तय्यब शेख, तलहा शेख, हमजा शेख व हनजला तय्यब यांची उपस्थिती होती

ईद ची नमाज नंतर इस्लाम ने मान्यता दिलेल्या व शासन मान्यते अनुसार पशूंची कुर्बानी दिली गेली . या कुर्बानी ला एक आख्यिका आहे ती म्हणजे ९६ वार्षिय इब्राहिम अलई हे सलाम यांना पुत्र रत्न प्राप्त झाले होते व त्या ८ वर्षीय पुत्र इस्माईल अलाहे सलाम यांची कुर्बानी देण्याचे संकेत स्वप्नात अल्लाह ने दिल्याने इब्राहिम अस.त्यांची कुर्बानी ला तयार झाले व त्यास इस्माइल अस. यांनी सुद्धा आनंदाने स्वीकारले परंतु जशी तलवार त्यांच्या गळ्यावर चालवली असता त्या ठिकाणी ती तलवार एका पशु वर चालली तेव्हा पासून ही कुर्बानी ची परंपरा सुरू आहे.

कुर्बानी म्हणजे निष्ठा
पवित्र कुराणात आहे की या जनावरांना आम्ही आशा प्रकारे वशीभूत केले आहे की ,जेणे करून तुम्ही कृतज्ञता व्यक्त करावी.त्यांचे मासही अल्लाहला पोहचत नाही की त्यांचे रक्त देखील नाही,परंतु त्याला तुमची निष्ठा पोहचते

अशा प्रकारे ही कुर्बानी केवळ अल्लाहवरील निष्ठा दर्शविण्याची एक प्रतिकात्मक कृती आहे. कुर्बानी दिलेल्या मांसाचा काही भाग भाविक,नातेवाईक व गरीब व्यक्ती मधे वाटून टाकतात.

रुहते हिलाल कमेटी,मुस्लिम ईद गाह ट्रस्ट व उलमा ए मस्जिद यांच्या सहमतीने नमाज घरो घरी अदा करण्यात आली.
कोणीही एक मेकांना आलींगन अथवा हात मिळवून मुबारक बाद दिली नाही.

Protected Content