यावल प्रतिनिधी – तालुक्यातील साखळी हे गाव नेहमी चर्चेतच राहिलेली असून 18 मार्च 19 रोजी फैजपूर विभागाचे पोलीस अधिकारी व यावल पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना गुप्त बातमीदारांनी दिलेल्या माहितीमुळे वरून साखळी येथे एका तरुणास तलवार घरात बाळगतांना रंगेहात पकडले त्याचे विरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या तरूणास अटक करण्यात आली आहे.
18 मार्च 19 रोजी साडेतीन वाजेच्या सुमारास साखळी गावात साखर अशक पाटील वय एकोणावीस या तरुणाकडे लोखंडी तलवार आहे, अशी गुप्त माहिती फैजपूर विभागाचे पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांना मिळाली त्यांनी यावल पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी. के .परदेशी यांना सदरची माहिती कळवली त्यानुसार त्यांनी संजय देवरे असलम खान राजेश वाढे सुशील घुगे या पथकाला साखळी गावी तात्काळ पाठवले व सदर तरुणाकडून लोखंडी तलवार जुनाट शून्य किमतीची जप्त केली पोलीस नाईक संजय देवरे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्टेशनला भाग 6 गुरं न 31 / 19 भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे 4 / 25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीआयडी. के. परदेसी यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलिस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल युनुस तडवी हे करीत आहेत.