घरात घुसून विवाहितेवर बलात्कार ; तिघांना अटक

नालासोपारा (वृत्तसंस्था) मुंबईजवळील नालासोपारा शहरात एका विवाहित महिलेवर घरात घुसून तीन नराधमांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

 

नालासोपारा पश्चिम परिसरात राहणारी महिला भाजी विक्रीचा व्यवसाय करते. तिचा रिक्षाचालक पती शुक्रवारी रात्रीच्या सुमारास रिक्षात सीएनजी भरण्यासाठी मीरा भाईंदर येथे गेला होता. महिला घरात एकटीच असल्याची संधी साधून तीन नराधमांनी घरात प्रवेश केला. घरात घुसल्यानंतर तीनही नराधमांनी आळीपाळीने महिलेवर बलात्कार केला व तिचा पती आल्यावर त्यालाही मारहाण करून तेथून पळ काढला. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून नालासोपारा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले आहे.

Protected Content