याबाबत अधिक माहिती अशी की, समील अजीज शेख (वय-४८) रा. मन्यार अली परिसर चोपडा हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते चोपडा बस आगारात बस चालक म्हणून नोकरीला आहे. १५ मे रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पुढच्या हॉल मध्ये बॅगेत ठेवलेले २ लाख २६ हजााराची रोकड चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी त्यांनी परिसरात शोधाशोध केली परंतू बॅगेचा पत्ता लागला नाही. अखेर १७ मे रोजी चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि घनश्याम तांबे करीत आहे.
घरातून २ लाख २६ हजार रूपयांची बॅग चोरट्यांनी लांबविली
3 years ago
No Comments