एरंडोल प्रतिनिधी । कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांचे रोजगार बुडालेत. त्यामुळे घरगुती वीज बिल माफ करण्याची मागणी मनसेने महावितरण विभागाला निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कोरोना आजारामुळे शासनाने लॉकडाऊन सुरू केले आहे. त्यामुळे हातावर मजुरी व लहान दुकानदार हे सुमारे ८० ते ९० टक्के कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. ही लोक विजबिल भरू शकत नसल्याने त्यांचे विजबिल माफ करावे अशी विनंती करण्यात आली आहे. या निवेदनावर मनसे तालुकाध्यक्ष विशाल सोनार, शहराध्यक्ष गोकुळ वाल्डे, कमलाबाई माळी, यशोदाबाई अहिरे, सुबधाबाई माळी, लताबाई भांडारकर, मंगलाबाई शिंपी, गणेश जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.