ग.स. सोसायटी सभासदांना १० टक्के लाभांश

 

जळगाव प्रतिनिधी। ग. स. सोसायटीच्या सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला असून हा लाभांश संबधित शाखेत उद्या बुधवार ११ नोव्हेंबरपासून चेकद्वारे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी लोकसहकार गटाचे गटनेते विलास नेरकर, उपाध्यक्ष सुनील पाटील, कर्मचारी नियंत्रण समितीचे अध्यक्ष विश्वास सूर्यवंशी, कर्ज समिती अध्यक्ष अनिल गायकवाड पाटील, संचालक तुकाराम बोरोले, दिलीप चांगरे, सुनील पाटील, यशवंत सपकाळे आदी उपस्थित होते.

दिवाळीपूर्वी बोनस मिळावा अशी मागणी सहकार गटातर्फे अध्यक्षांना करण्यात आली होती. कोरोनामुळे लाभ दिला जात नव्हता. राज्यपालांनी नुकताच आदेश देऊन त्यात सहकारी संस्था लाभांश जाहीर होऊ शकतात असे सांगितल्याने १० % लाभांश देण्यात ठरविण्यात आले आहे. ग. स. सोसायटीचे जिल्ह्यात सुमारे ४० हजार सभासद आहेत. त्या प्रमाणात ९ कोटी ८८ लाख ८८३ रुपयांचे वाटप होणार आहे. उद्या सकाळ दहापासून संबंधित शाखेत सभासदांना लाभाच्या चेकचे वाटप होईल. दरम्यान, सोसायटीचे जे सभासद दिव्यांग आहेत त्यांना एक लाख जादा कर्ज मंजूर करण्यात आले आहे. विशेष कर्ज मर्यादा ४ लाखावरून ६ लाख ५० हजारापर्यंत करण्यात आले आहे. महापालिकेकडे साडे पाच कोटीची थकबाकी होती ती पाच कोटी परत वसूल करण्यात आली आहे. कोरोना संसर्गामुळे तीन कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून त्यांच्या वारसांना सेवेत सामावून घेण्यात आले आहे. जनता अपघात विमा १ लाखावरून ३ लाखापर्यंत करण्यात आला आहे. कर्ज बुडव्यांवर वसुली द्यावे १०१चे व ९ प्रमाणे दावे दाखल करण्यात आले आहे. संस्थेचे कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे.

लोकसहकार गटाची मदत संपली असली तरी शासनाने संचालक मंडळाला ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ दिली आहे त्यानंतर शासन जो आदेश देईल त्याचे पालन करण्यात येणार आहे.

Protected Content