जळगाव । सरकारी नोकरांची सहकारी सोसायटी म्हणजेच ग. स. सोसायटीतर्फे कोरोनाग्रस्तांसाठी ११ लाख रूपयांचा निधी प्रदान करण्यात आला असून याचा धनादेश आज राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना देण्यात आला.
ना. गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी वैयक्तीक पातळीपासून ते विविध व्यापारी, उद्योजक, सामाजिक संस्था, सहकारी संस्था आदींनी मदत करण्याचे आवाहन केले असून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जळगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने पाच लाखांची मदत केली. यानंतर धरणगावच्या नगरपरिषदेनेही मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत प्रदान केली. यानंतर आता सरकारी नोकरांची सहकारी सोसायटी अर्थात, ग.स. सोसायटीनेही अकरा लाखांचा निधी दिलेला आहे.
ग.स. सोसायटीचे चेअरमन मनोज पाटील यांनी ना. गुलाबराव पाटील यांना ११ लाख रूपयांच्या मदतीचा धनादेश प्रदान केला. याप्रसंगी सोसायटीचे उपाध्यक्ष सुनील पाटील, संचालक तुकाराम बोरोले, विलास नेरकर, एन.एस. पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती. ना. गुलाबराव पाटील यांनी ग.स. सोसायटीच्या दातृत्वाचे कौतुक केले.
दरम्यान, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जिल्ह्यातून आजवर ४७ लाख रूपयांची मदत पाठविण्यात आलेली आहे. समाजाच्या सर्व स्तरांमधील नागरिकांनी यात आपापल्या परीने भर टाकावी. याच्या जोडीला सामाजिक संस्था, सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आदींनीही सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००