जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – जिल्ह्यातील ग.स. सोसायटीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २७८ अर्ज निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांनी दाखल केले आहेत. त्यापैकी मंगळवारी दोन तर बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यत १२ असे एकूण १४ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असल्याची माहिती जिल्हा निबंधक सहकारचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.
जळगाव जिल्हा सहकारी नोकरांची संस्था हि जिल्ह्यातच नव्हेतर संपूर्ण आशिया खंडात ग.स. सोसायटी म्हणून प्रसिध्द असून ग.स. सोसायटीचे ३२०४४ सभासद मतदार असून आहे. या संस्थेची निवडणूक नामांकन प्रक्रिया २५ ते ३१ मार्च दरम्यान होती. त्यात २७८ उमेदवारांनी निवडणूक अर्ज दाखल केले होते. तर सोमवार १८ एप्रिल अखेर माघारीची मुदत असून या दोन दिवसात १४ उमेदवारांनी निवडणूक अर्ज माघारी घेतले आहे.
या निवडणुकीसाठी २८ महिला राखीव, १८ इतर मागासवर्गीय, १२ अनु.जाती.-जमाती, ५४ स्थानिक, १४१ बाहेरील आणि २५ भटक्या विमुक्त अशा एकूण २७८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात १४ जणांनी माघार घेतली असून १८ एप्रिल माघारीनंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी प्रसिद्धी केली जाणार असून २८ एप्रिल रोजी मतदान तर ३० एप्रिल रोजी मतमोजणी केली जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी म्हटले आहे.