ग.स. निवडणूक : चार तासात सरासरी २५ टक्के मतदान (व्हिडिओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग.स. सोसायटीच्या २१ जागांसाठी पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान सुरू झाले आहे. जिल्ह्यात एकूण १५ मतदान केंद्र आहेत. दुपारी १२ वाजेपर्यंत सर्वच केंद्रांवर सरासरी २५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज प्रशासनाने दिला आहे.

 

ग. स. सोसायटीच्या निवडणुकीत २१ जागांसाठी पाच पॅनलमध्ये लढत होणार आहे. आज गुरुवार दि. २८ एप्रिल रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान मतदान होत आहे. ग.स.सोसायटीच्या निवडणुकीच्या २१ जागांसाठी सहकार , लोकसहकार , लोकमान्य , प्रगती शिक्षक सेना आणि स्वराज्य पॅनल यांच्यासह अपक्ष उमेदवार रिंगणात आहे. या निवडणुकीसाठी ११५ उमेदवार रिंगणात आहेत. शनिवार दि. ३० रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी ३६ हजार १७५ मतदार मतदानासाठी पात्र आहेत.
जळगाव शहरातील ख्वाजा मिया चौकातील प.न. लुकंड कन्या शाळा या केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केली आहे. निवडणुकीच्या रिंगणात पाच पॅनल असल्याने मतदारांमध्ये नक्की कोणाला मतदान करावे याबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते. मतदान केंद्रावर योग्य नियोजन नसल्याने एक मतदाराला मतदान करायला जवळपास अर्धातासापेक्षा जास्त वेळ लागत होता. तर केंद्राबाहेर दोन्ही रस्त्यावर वाहनांची कोंडी झाल्याने ट्राफिक जामचा सामना मतदारांना करावा लागला.

दुपारी १२ वाजेपर्यंत सरासरी २५ टक्क्यापर्यंत मतदान झाल्याचा अंदाज आहे. जिल्ह्यातील सर्वच केंद्रावर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासह ते कसे वेळेत पार पडेल यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे जिल्हा उप निबंधक (सहकार) संतोष बिडवई यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूज शी बोलतांना सांगितले.

 

महापौरांनी बजावला मतदानाचा हक्क

जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री सुनिल महाजन या स्वतः शिक्षिका असून ग.स.सोसायटीच्या सभासद देखील आहेत. सकाळीच त्यांनी शहरातील प.न.लुंकड कन्या शाळा या केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. ग.स.सोसायटी आशिया खंडातील वैशिष्ट्यपूर्ण आणि मोठी सोसायटी आहे. ग.स.सोसायटीच्या निवडणूक प्रक्रियेत सर्व सभासदांनी सहभागी होत आपला मतदानाचा हक्क अवश्य बजवावा, असे आवाहन महापौरजयश्री सुनिल महाजन यांनी याप्रसंगी केले.

भाग १
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/801840074110657

भाग २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1177832586296858

Protected Content