बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण भाग जर आर्थिक सक्षम करून प्रत्येकाच्या हाताला काम आणि येणाऱ्या काळात प्रगती करण्यासाठी कृषीग्राम उद्योगाची नितांत आवश्यकता आहे. असे प्रतिपादन माजी कृषी उपसंचालक अनिल भोकरे केले. बुलढाणा जिल्ह्यातील गोहगाव दांदडे, तालुका – मेहकर, जिल्हा – बुलढाणा येथे छत्रपती शिवाजी ब्रिगेड व भास्करराव काळे प्रतिष्ठान आयोजित कृषी उद्योग मार्गदर्शन शिबिराच्या प्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, जर शेतीला जोडधंदा म्हणून उद्योगाबाबत आपण निश्चय केला तर येणाऱ्या काळामध्ये आपण मोठी प्रगती करून ग्रामरोजगार निर्माण करू शकतो. त्यासाठी जे हवे ते मार्गदर्शन व सहकार्य केले जाईल असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
तज्ञ समाधान पाटील जळगाव यांनीही विविध ग्रामीण उद्योगाबाबत व शासकीय योजना बाबत सविस्तर माहिती देऊन त्यामध्ये शासकीय योजनासाठी सबसिडी संदर्भातील पुरेपूर माहिती दिली. अभिषेक अकोटकर यांनीही ग्रामीण भागातल्या तरुणांना जर पुढे जायचं असेल तर उद्योग असे पर्याय नाही म्हणून युवकांनी सुद्धा त्यासाठी तयार व्हावा असं आवाहन केलं. या कार्यक्रमाचे आयोजक छत्रपती शिवाजी ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे यांनी आपल्या मनोगतामध्ये विविध उदाहरणे देऊन ग्रामीण भागत जी आजची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. त्यातून बाहेर निघण्यासाठी युवा पिढीने येणारा काळामध्ये नवीन क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवला पाहिजे, त्यासाठी छत्रपती शिवाजी ब्रिगेड आणि भास्करराव काळे प्रतिष्ठानकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे आपल्या मनोगत सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भास्करराव प्रतिष्ठानचे प्रमुख भास्करराव काळे यांनी केले. सूत्रसंचालन गोपाल आखाडे यांनी केले. यावेळी माजी आमदार तोताराम कायंदे, नगर जिल्ह्यातील साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक पटारे, सरपंच प्रदीप काळे रेड स्वस्तिक सोसायटी पुणेचे सचिव सचिन भामरे, प्रकाश आडेलकर, पंकज पळसकर, डॉ. विजय छबिले, अभियंता. डी. एस. शिंदे यांचे सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.