मोरगाव-खिरवळ नदीपत्रात गौण खनीज वाहतूक करणारे चार ट्रक्टरे जप्त

रावेर, प्रतिनिधी | अवैध गौण खनीज वाहतूक करणारे चार ट्रक्टर-ट्रॉली रात्री दहाच्या सुमारास रावेर महसूल पथकाने जप्त केले आहे. यामुळे गौण खनीज वाहतूकदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

 

याबाबत वृत्त असे काल रात्रीच्या सुमारास मोरगाव खिरवळ नदी पात्र नाल्यामध्ये अवैध गौण खनिजची वाहतूक होत.असल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली होती. काल रात्री दहाच्या सुमारास महसूल पथकाने घटनास्थळी जाऊन चार ट्रक्टर ट्रॉली १) एमएच १९ ए एन २४४७ ,२) एमएच १९ टी १६३० ,३)स्वराज्य नविन टेक्टर विना नंबर ,४) एमएच १९ सिवाय १६४१ जप्त करण्यात आले होते ही कारवाई मंडळ अधिकारी विठोबा पाटील गजेंद्र शेलकर सुधिर सोनवणे, जे. डी. बंगाळे यांच्या पथकाने केली आहे.

Protected Content