भुसावळ प्रतिनिधी । जिल्ह्यात ठिकठिकाणी गौणखनिजाच्या झालेल्या घोळाची चौकशी योग्य पध्दतीने होत नसून याबाबत माहिती देखील मिळत नसल्याने अखेर जिल्हा परिषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी थेट जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकार्यांनाच नोटीस बजावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, कुर्हा-वराडसीम गटाच्या जिल्हा परिषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांनी जिल्ह्यातील गौण खनिजाच्या रॉयल्टीत झालेल्या घोटाळ्याचे प्रकरण लावून धरले आहे. या प्रकरणी आता त्यांनी थेट उच्च न्यायालात धाव घेतली असून अॅड. हरेशकुमार डी. पाटील यांच्या मार्फत नोटीस बजावली आहे.
या नोटिसमध्ये म्हटले आहे की, आमचे अशिल हे भुसावळ तालुक्यातून कुर्हा-वराडसीम गटातून जि.प.सदस्य गटातून निवडून आलेले आहे. तसेच आमचे अशिल हे जि.प.जळगाव येथे जल व्यवस्थापन व पाणी पुरवठासमितीचे सदस्य आहे. आमचे अशिलांनी जळगाव जिल्ह्यामध्ये होत असलेल्या अनेक बेकायदेशीर बाबीबाबत व भष्ट्राचाराबाबत आवाज उठवलेला आहे. आमचे अशिल यांनी नुकताच जि. प.जळगाव येथील सिंचन विभागातील गौणखनिज वाहतूकीचे परवाने व त्याद्वारे शासनाची केलेली आर्थिक लूट, भष्ट्राचार तसेच राजमुद्रेचा गैरवापर या संदर्भात भष्ट्राचार बाहेर काढलेला आहे. त्यासंदर्भात नोटीस घेणार यांना सविस्तर तक्रार अर्ज दाखल करून देखील आजपावेतो संबंधीतावरती गुन्हा दाखल न झाल्याने सदरची नोटीस आमचे अशिलांमार्फत देण्यात येत आहे.
यात पुढे म्हटले आहे की, आमचे अशिल यांनी नोटीस घेणार यांना सविस्तर माहिती व पुराव्याच्या आधारे दि.२८/०९/२०२० रोजी सिंचन विभाग जि.प.जळगांव यांच्यामार्फत जलयुक्त शिवार, जलसंधारण विभाग व इतर योजनांमध्ये सन.२०१४ ते २०२० या कालावधीमध्ये गौणखनिज रॉयल्टी रक्कम व त्यासाठी बनावट गौणखनिज परवाने, कागदपत्रे तयार करून, बेकायदेशीर राजमुद्रेचा वापर करून कोटयावधी रूपयांचा भ्ट्राचार नोटीस घेणार क्रं.२ यांच्या कार्यालयातील संबंधीत विभागचे अधिकारी व ठेकेदार यांनी संगनमत व कटकारस्थान करून केलेल्या भष्ट्राचाराबाबत तक्रार दिलेली आहे. या तक्रारीबाबत नोटीस घेणार यांनी तात्काळ गुन्हा दाखल करणे आवश्यक असतांना, कर्तव्यात कसूर करून आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आमच्या अशिलांकडून सदरची नोटीस देण्यात येत आहे.
आमचे अशिल यांनी दि. २८/०९/२०२० रोजी नोटीस घेणार क्रं. १ दिलेल्या तकर अर्जाबाबत आजपावेतो कोणतीही योग्य कार्यवाही झालेली नाही. तसेच नोटीस घेणार कं.२ यांच्याकडेसर्वसाधारण सभेत दि. २८/०९/२०२० रोजी याबाबत सविस्तर तक्रार दिलेली आहे. त्याअनुषंगाने नोटीस घेणार क्रमांक २ यांनी ४ सदस्य समिती जिल्हा जलसंधारण विभाग जि.प.जळगांव यांच्या अंतर्गत कामाच्या देयकासमवेत दर्शविण्यात आलेल्या रॉयल्टीच्या रक्कमामध्ये तसेच देयका समवेत जोडण्यात आलेत्या पावत्यांच्या तपशिलात फार मोठया प्रमाणात तफावत असल्याबाबत सदरची समिती नियुक्त करण्यात आलेली आहे परंतू आज पावेतो सदर समितीने कोणतेही काम केले नसत्याने सदरील भष्ट्राचार बाहेर काढण्यासाठी व दोषीवर गुन्हा दाखल होण्यासाठी नोटीस घेणार कर.२ व सदरील ४ सदस्य समिती यांच्याकडून वेळ काढूपणा , कर्तव्यात कसूर केला जातआहे.
आमचे अशिल यांनी नोटीस घेणार यांना दिलेल्या तक्रारी मध्ये गौणखनिज रॉयल्टी रक्कमेमध्ये कागदपत्रासह कशाप्रकारे संबंधीत अधिकारी व ठेकेदार यांनी भष्ट्राचार केलेला आहे. याबाबत सतिस्तर माहिती व कागदपत्रे नोटीस घेणार क्रं. १ व २ यांच्याकडे दिलेली आहे. गौणखनिज वाहतूक परवाना यासाठी वापरण्यात आलेली वाहने व त्यावावत उपप्रादेशिक परीवहन अधिकारी जळगाव यांच्याकडून घेतलेल्या माहितीप्रमाणे वाहन क्रं. एम. एच.१९ ए.एन. २२७३ हे अंकुश राठोड यांच्यानावे अँग्रीकल्चर ट्रॅक्टर म्हणून नोंद आहे. परंतू याच वाहनाच्या नावावरती जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव गौणखनिज विभाग यांच्याकडून परवाना दि.१६/०८/२०१९ रोजी वाहन चालक दिनेश सैदाणे या नाढाने आहे. तसेच .एम.एच. १९ बी.झेड. ४६०८ अशा वाहनावर खौणखनिज परताना असून सदरचे वाहन हे आर.टी.ओ.ऑफिस मध्ये बजाज स्कूटर मालक चिंतामण जाधव या नावाने नोंदणीकृत आहे तर या वाहनाच्या नावे जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथून दि.०२/०४/२०१९ रोजी गौणखनिज परवाना दिलेला आहे अशा प्रकारे अनेक बनावट गौणखनिज परवाने / पावत्या तयार करुन संबंधित ठेकेदार व अधिकारी यांनी कट कारस्थान करून शासनाची कोटयावधी रूपयामध्ये वैयक्तीक स्वार्थसाठी भष्ट्राचार केलेला आहे.
आमचे अशिल यांनी सिंचन विभाग जळगांव जि.प.जळगांव यांच्या अंतर्गत जलसंधारण, जलयुक्त शिवार या योजनामध्ये सन,२०१४ ते २०२० या कालावधीमध्ये करण्यात आलेल्या कामाची व गौणखनिज यावाबत माहिती घेतली असता. तहसिलदार पाच
ोरा यांच्या कार्यालयातून दिलेले शरद बळीराम पाटील रा.नांद्रा ता. पाचोरा यांच्याकडील पत्र गौणखनिज परवाना आदेशाची प्रत श्री.सुर्यकांत देविदास निकम जलसंधारण विभाग जि.प.जळगांव यांनी दिलेली आहे. सदरील गौणखनिज परवाना यांचे अवलोकन केले असता सदरील परवाने हे प्रथमदर्शनी बनावट व त्यावरील नमूद राजमुद्रेचा शिक्का देखील बनावट असल्याचे प्रथमदर्शनी आमच्या अधिशलांना वाटत अल्याने त्यावानत आमचे अशिल यांनी दि.०८/०२/२०२० तहसिलदार पाचोरा यांच्याकडून एकूण ४५ परवानेबाबत सत्यता पडताळणी केली असता त्यांनी दि.२१/०९/२०२० रोजीच्या पत्रान्वये माहिती दिलेली आहे की, दि.१०/१२/२०१५ ते १५/०२/२०१६ या कालावधीमध्ये सदरील परवानेची नोंद वहीत नाही त्यामुळे सदरचे परवाने हे बनावट आहे असे दिसून येते. तसेच सदर परवाना मध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्जदार यांनी १५/०६/२००५ मध्ये मागणी केलेली असून सदरचा परवाना हा सन.२०१५ व २०१६ मध्ये देण्यात आलेला आहे असे दिसून येते. तसेच सदरील गौणखनिज परवाना वरती नमूद राजमुद्रा व तहसिलदार सो.पाचोरा यांची सही देखील बनावट आहे. याबाबत सविस्तर माहिती व तक्रार देऊन देखील संबंधीतांनी तात्काळ राजमुद्रेचा अपमान व बेकायदेशीर वापर झाल्याने तात्काळ संबंधीतावरती गुन्हे दाखल करणे आवश्यक असताना आजपावेतो कोणतेही प्रकारची कार्यवाही राजद्रोहा सारख्या गुन्हयांमध्ये झालेली नाही हि बाब बेकायेदशीर व खेदजनक आहे.
आमचे अशिल यांनी सन.२०१४ ते २०२० या कालाधीमध्ये जलसिंचन विभाग जि.प. जळगांव यांच्यामार्फत करण्यात आलेल्या कामामध्ये भष्ट्राचार झालेला आहे. यावाबत संबंधीत विभागाकडून माहिती घेतली असता, संबंधीत कामाचे अंदाजपत्रकीय रक्कम यामध्ये नमूद गौणखनिज देयक ही प्रत्येक कामामध्ये ततोतंत अदा करण्यात आलेली आहे. उदा.मस्कावद ता.जळगांव येथील साठवण अंदाजपत्रक रक्कम १६,३५,०००/- असून त्यात गौणखनिज अंदाजपत्रकीय रक्कम ९१,६८१/अशी आहे. तर धनादेशाने ठेकेदारास अदा केलेली रक्कम देखील ९१,६८१/- इतकीच आहे. अशा प्रकारची रक्कम प्रत्येक कामात ततोतंत अदा करण्यात आलेली आहे. अंदाजपत्रकातील गौण देयक रक्कम व ठेकेदारास अदा केलेली गौणखनिज रक्कम हि वास्तविक पाहता कधीही तंतोतंत मिळू शकत नाही. परंतू ही देखील किमया नोटीस घेणार क्र.२ यांचे अधिकारी सिंचन विभाग व संबंधीत ठेकेदार यांनी करून दाखविलेली आहे. तसेच आमचे अशिल यांना पुरविण्यात आलेल्या माहितीप्रमाणे बिलासोबत कोणत्याही प्रकारच्या पावत्या ठेकेदार यांनी दिलेल्या नसताना बेकायदेशीरपणे गौणखनिज रॉयल्टी रक्कम संबंधीत ठेकेदार व अधिकारी यांनी संगनमत करून काढून घेतलेली आहे व अशाप्रकारे शासनाची कोटयावधी रूपयाची फसवणुक, अपहार, भष्ट्राचार केलेला आहे.
७ आमचे अशिल यांनी प्राप्त केलेल्या माहिती प्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या नावे मंजूरअसलेले गौणखनिज परवाने देखील बनावट दिसून येत आहे. त्यामध्ये एकाच वाहनचालकाचे नाव असून सदरील वाहतूक परवाना वरती वाहन चालकाची सही नाही, इनव्हॉइस क्रमांक नमूद नाही, टू-व्हिलर व श्री-व्हिलर वाहनांचे नंबर नमूद आहे सदर वाहनाच्या पावत्या जिल्हाधिकारी व संबंधीत तहसिलदार यांच्याकडून प्रामाणित केलेल्या नाही. तसेच सदरील जलसिंचनाच्या कामांमध्ये गौणखनिज परवाने प्रथमदर्शनी बनावट असतांना संबंधीत अधिकारी व ठेकेदार यांनी संगनमत त कटकारस्थान करून कोटयावधी रुपयांचा भष्ट्राचार केलेला आहे त्यासंदर्भात संपूर्ण पुरावे व कागदपत्रे आमचे अशील यांच्याकडे आहेत. त्याबाबत नोटीस घेणार क्र.१ व २ यांना सविस्तर तक्रार अर्ज देऊन देखील अशा प्रकराच्या गंभीर स्वरूपाच्या गुन्हयांबाबत गुन्हा दाखल झालेला नाही.
सदरील नोटीसीद्वारे आपणास नोटीस घेणार यांना कळविण्यात येते की, आमचे अशिल यांनी नोटीस घेणार यांना दि.२८/०९/२०२० रोजी दिलेल्या तक्रार अर्जानुसार संबंधीत ठेकेदार व अधिकारी जलसिंचन विभाग जळगांव यांच्यावरती तात्काळ ७ दिवसाच्या आत चौकशी करून गुन्हे दाखल करावे अन्यथा कर्तव्यात कसूर करणे, वेळ काढून पणा करणे, गुन्हा दाखल न करणे याबाबत उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे जनहित याचिका वा रिट याचिका दाखल करावी लागेल त्यामध्ये तुम्हाला सामनेवाला म्हणून शामिल करण्यात येईल असे नमूद करत ही नोटी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या सीईओंना पाठविण्यात आली आहे.