Home क्राईम गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा

गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा

0
24

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील हडसन शिवारात बेकायदेशीर गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रक्टर चालकाविरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 

याबाबत माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील हडसन शिवारातून विनापरवाना गौण खनिजाची चोरटी वाहतूक करतांना ट्रक्टर चालक राजेंद्र उर्फ दादाभाऊ सुरेश रा. संभाजी नगर बाहेरपुरा ३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ ते १ वाजेच्यादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असतांना पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर पाटील यांना आढळून आला. ट्रॅक्टरवर कारवाई करत असतांना एक अनोळखी व्यक्ती दुचाकी (एमएच १९ बीडी ७९४३) वर येवून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी ट्रक्टर चालक राजेंद्र सुरेश पा. याच्याविरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप सोनवणे करीत आहे.


Protected Content

Play sound