Home Cities पाचोरा गो.से. हायस्कूलमध्ये “वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन

गो.से. हायस्कूलमध्ये “वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन


पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील श्री. गो. से. हायस्कूलमध्ये २ व ३ जानेवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन “चला, या नविन वर्षाचे स्वागत करु या”, “जुन्या स्वप्नांना पुन्हा नव्याने फुलवु या” चे आयोजन करण्यात आले असुन या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन धुळे येथील प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत जगदिश देवपुरकर यांच्या हस्ते संपन्न झाले.

विविध सांस्कृतिक कार्यक्रम, बक्षिस वितरण व समारोप अशा भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थानी शालेय समिती चेअरमन खलिल देशमुख तर पाहुणे म्हणून तांत्रिक विभाग चेअरमन वासुदेव महाजन, सिद्धीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्निल पाटील, दर्शन फॅशनचे ओम राठी, युनिक काॅम्प्युटरचे स्वप्निल ठाकरे, आशिर्वाद काॅम्प्युटरचे संचालक अतुल शिरसमणे, शितल अॅकेडमीचे रोहन पाटील, मे. पंडित अभिमनशेठ सराफ ज्वेलर्सचे जगदिश सोनार, वाघ डेअरीचे संचालक अश्विन वाघ, ओम हाॅस्पिटलचे अजयसिंग परदेशी, थेपडे बिल्डर्सचे संचालक अपुर्व थेपडे, ओमलक्ष्मी सिरॅमिक संचालक सुरज वाघ, गजानन डेअरीचे संचालक योगेश पाटील हे उपस्थित होते. स्नेहसंमेलनाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला वाघ केले. सुत्रसंचलन अंजली गोहिल, वैशाली कुमावत, हर्षदा पाटील यांनी केले.

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, येथील श्री. गो. से. हायस्कूलमध्ये आज २ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन जगदिश देवपुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत रांगोळी, चित्रकला, हस्तकला, विज्ञान प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गीतगायन, सामुहिक नृत्य, नाट्यछटा, तसेच दि. ३ जानेवारी रोजी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत अल्पोपहार, सांस्कृतिक कार्यक्रमात फॅन्सी ड्रेस, गीतगायन, सामुहिक नृत्य, बालनाट्य व तदनंतर स्नेहसंमेलनाचा समारोप व बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. दोन दिवशीय स्नेहसंमेलन यशस्वीतेसाठी श्री. गो. से. हायस्कूलचे सर्व पर्यवेक्षक, हायस्कूलचे तांत्रिक विभाग, किमान कौशल्य विभाग, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे परिश्रम घेत आहे.


Protected Content

Play sound