रावेर प्रतिनिधी । काही दिवसांपूर्वी कंटेनर मधून गोवंशाची अवैध तस्करी करतांना आढळून आल्यानंतर फरार झालेल्या चालकाला आज अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत वृत्त असे की, काही दिवसांपूर्वी गोवंशाची अवध वाहतूक करणारा कंटेनर आढळून आला होता. यावरल ड्रायव्हर हा मात्र फरार होण्यात यशस्वी झाला होता. त्याच्या विरूध्द रावेर पोलीस स्टेशन भाग ०५ गु. र. नं.- ११५/२०२० भादंवि कलम- ४२९ महा. पशु संवर्धन अधि-५अ, ब,९ महा.पशु क्रूरता अधि.११ चे (१)(-)(ऋ)(क)(घ)(ख)९ महा पोलीस अधि.१९५१ चे क१९९ महा पशु वाहतूक अधि-४७,४८,४९(अ) मोटार वाहन कायदा क ८३/१८७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
दरम्यान, रावेर पोलिसांनी संबंधीत चालक आरोपी- नामे वसीम नूर मोहम्मद (वय ३१ रा कोसीकलॉ ता. छाता जि मथुरा राज्य उत्तर प्रदेश) याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. आज रावेर न्यायालायने सदर आरोपी यास दि ०९ जुलै पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. दरम्यान, या कंटेनरचा मालक तथा या प्रकरणातील सहआरोपी सद्दाम सईद (रा कोसिकला ता छाता जि मथुरा राज्य उत्तर प्रदेश) हा मात्र अद्यापही फरार आहे. ही कारवाई डीवायएसपी पिंगळे, पो. नि. रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय मनोज वाघमारे यांनी केली आहे.