गोवंडी, कुर्ला प्रभाग समित्यां राष्ट्रवादी आणि समाजवादीसाठी सेना सोडणार

मुंबई : वृत्तसंस्था । पालिकेच्या स्थायी, शिक्षण, सुधार, बेस्ट या वैधानिक समित्यांसह विशेष समित्यांच्या निवडणुकीत समाजवादी पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला केलेल्या मदतीची बक्षिसी दिली जाणार आहे. गोवंडी व कुर्ला समित्यांमध्ये सेना उमेदवार उभे न करता त्या राष्ट्रवादी आणि समाजवादीसाठी सोडणार आहे.

पालिकेच्या वैधानिक समित्यांच्या निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मते वळवण्यात शिवसेना यशस्वी ठरली. काँग्रेसला तटस्थ ठेवून विरोधी पक्ष म्हणून त्यांचे स्थानही अबाधित राखण्याचा प्रयत्न सेनेने केला. या बदल्यात समाजवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रभाग समित्या सोडण्याची तयारी सेनेने केली आहे. समाजवादी पक्षाला गोवंडी एम/ पूर्व प्रभाग समिती आणि राष्ट्रवादीला कुर्ला एल प्रभाग समिती सोडण्यात येणार आहे. यावर्षी या दोन समित्या घेतल्यास त्यांना पुढील वर्षी विशेष समिती सोडली जाऊ शकते,

समाजवादी पक्षाचे पालिकेतील गटनेते आमदार रईस शेख यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी सेनेकडून असा प्रस्ताव आला असल्याचे सांगितले. आमचा पक्ष लवकरच सेनेला उत्तर पाठवणार आहे.भाजपसारख्या जातीयवादी पक्षाला दूर ठेवण्यासाठी आम्ही सेनेला मदत केली, असे शेख यांनी स्पष्ट केले.

Protected Content