जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गोलाणी मार्केट येथून तरुणाची ४० हजार रुपये किंमतीची ईलेक्ट्रीक दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत शुक्रवार १९ ऑगस्ट रोजी दुपारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जयेश राजेंद्र भंगाळे (वय-२४) रा. कोल्हे नगर, जळगाव हा तरुण आपल्या कुटुंबियांचा वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतो, त्याच्याकडे त्याची इलेक्ट्रिक मोटरसायकल आहे. गुरुवार १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता सुमारास कामाच्या निमित्ताने दुचाकीने शहरात आला होता. त्याने दुचाकी गोलाणी मार्केट जवळील महेश प्रोव्हिजनसमोर पार्किंगला लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ४० हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक दुचाकी चोरून नेली. काम आटोपून जयेश हा दुचाकीजवळ आला असता त्याला दुचाकी जागेवर मिळून आली नाही. त्याने परिसरात सर्वत्र शोध घेतला.
परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. अखेर शुक्रवार १९ ऑगस्ट रोजी दुपारी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश बोरसे करीत आहे.