जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गोलाणी मार्केट परिसरातील अमर रगडा समोरून तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याप्रकरणी शनिवारी २३ जुलै रोजी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वकील उखा राठोड (वय-२८) रा. रामदेववाडी वावडदे ता.जि.जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतो. शुक्रवारी २२ जुलै रोजी दुपारी १ ते २ वाजेच्या सुमारास वकील राठोड हा दुचाकी (एमएच १९ यू ३२१९) ने शहरातील गोलाणी मार्केट परिसरात कामानिमित्त आलेला होता. त्याने गोलाणी मार्केटजवळील अमर रगडा दुकानाच्या सुमोर आलेल्या मोकळ्या जागेत त्याची दुचाकी पार्किंगला लावलेली होती. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. काम आटोपून वकील राठोड हा दुचाकीजवळ आला असता त्याला दुचाकी मिळून आली नाही. परिसरात सर्वत्र शोध घेवून न मिळाल्याने शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. शनिवारी २३ जुलै रोजी दुपारी १२ वाजता वकील राठोड यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश पाटील करीत आहे.