जामनेर, प्रतिनिधी | शहरात गेल्या एक वर्षापासून मोहन भवन प्रतिष्ठानतर्फे गरजूंना विविध प्रकारची मदत दिली जात आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेची प्रतिष्ठान हे विश्वासाचे माहेरघर असल्याचे नगराध्यक्ष साधना महाजन यांनी सांगितले आहे.
जामनेर शहरातील मोहन भवन प्रतिष्ठान च्या वतीने शहरातील गोरगरीब गरजूंना गेल्या बारा महिन्यापासून पाचशे रुपये मदत निधी वाटप करण्यात येत आहे. १९ रोजी या योजनेच्या समारोप १२० गरजूंना लोकनियुक्त नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते वाटप करून करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोदकुमार लोढा , सन वंदना लोढा, दीपक देशमुख, प्रदीप दिनकर, गोपाल देशपांडे, वसीम जीतू, पालवे सुजित, सैतवाल आदी उपस्थित होते. दरम्यान मोहन प्रतिष्ठान तर्फे कोरोना महामारी च्या काळामध्ये अनेक लोकांना मदतीचा हात दिला. काहींना राशन किट तर काहींना रोख निधी स्वरूपात देण्यात आला. यामुळे आता मोहन भवन प्रतिष्ठानचे कार्य अशीच अतिशय चांगले असून पुढील येणाऱ्या काळात विविध माध्यमातून गोरगरीब जनतेला मदत करण्यात येईल अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद लोढा यांनी यावेळी दिली.