पारोळा, प्रतिनिधी | गोपी कमल फाऊंडेशन यांच्या वतीने २५० गरजू महिलांना हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर ब्लँकेट वाटप करण्यात आले.
गोपी कमल फाऊंडेशन यांच्या वतीने गरजू महिलांना ब्लँकेटचे वाटप सेवानिवृत्त नायब तहसीलदार गोपीचंद बाविस्कर व कमलाबाई बाविस्कर, नगरसेवक पी.जी. पाटील, संस्थेचे सचिव प्रशांत बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. गोपी कमल फाउंडेशन अध्यक्ष राहुल बाविस्कर, उपाध्यक्ष संदीप गिरासे यांच्या मार्गदर्शनाने ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रशांत सिद्धी यशवंत चव्हाण सनी सिद्धी कुंदन पाटील महेंद्र पाटील केतन पाटील नीरज जाधव आदी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन व आभार गोरख सूर्यवंशी यांनी मानले