Home Cities जळगाव गोपीनाथ मुंडे असते तर आज राजकारणाची दिशा वेगळी असती – एकनाथ खडसे...

गोपीनाथ मुंडे असते तर आज राजकारणाची दिशा वेगळी असती – एकनाथ खडसे (व्हिडीओ)

0
152

जळगाव प्रतिनिधी । गोपीनाथ मुंडे असते तर आज राजकारणाची दिशा वेगळी असती, असे प्रतिपादन आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केले. त्यांनी आज आपल्या घरी गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी केली. त्यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केले.

त्यानंतर वार्ताहरांशी बोलताना एकनाथराव खडसे म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणाची दिशा बदलली त्यांना जाऊन आज ६ वर्षे झाली. या काळात एकही दिवस असा नाही की त्यांची आठवण झाली नाही ते अआयुष्यभर दुर्बलांसाठी काम करत राहिले कार्यकर्त्यांवर त्यांचे प्रेम होते म्हणून ते कार्यकर्ते जडत राहिले ते अचानक गेल्याने हानी झाली ते होते तोपर्यंत राज्याच्या राजकारणाची दिशा वेगळी होती.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/185478386571773


Protected Content

Play sound