गोपीचंद पडळकर समजूतदार कार्यकर्ता, पण शब्द चुकले : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर (वृत्तसंस्था) गोपीचंद पडळकर समजूतदार कार्यकर्ता आहेत. पडळकरांचे शब्द चुकले, पण शरद पवार यांच्याबद्दल त्यांच्या मनात आदर आहे, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पडळकरांच्या वक्तव्यावरून झालेल्या वादावर दिली आहे.

 

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर आज राज्यभरात राष्ट्रवादीने आंदोलनं करत आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माझ्याबद्दल काहीही बोललेले राष्ट्रवादी काँग्रेसला चालते का? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच गोपीचंद पडळकर समजूतदार कार्यकर्ता आहेत. पडळकरांचे शब्द चुकले, पण शरद पवार यांच्याबद्दल त्यांच्या मनात आदर आहे. शरद पवार यांनी छोट्या जातीला महत्त्व दिले नाही हा पडळकर यांचा अनुभव असेल. अनादर व्यक्त करण्याचा त्याचा हेतू नव्हता. फडणवीस यांनी पडळकर यांना शब्द जपून वापरण्याची समज दिली आहे. पण दुसरीकडे माझ्याबद्दल कोणीही काही बोलतं, फडणवीस आणि मला कुठलीही टोपण नावं ठेवता? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. तुम्ही अग्रलेखात काय लिहिता? ‘जेव्हा तुम्ही गोधड्या भिजवत होता?’ ही अग्रलेखाची भाषा असते का? असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेलाही टोला लगावला आहे.

Protected Content