गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात लाडक्या बाप्पांचे जल्लोषात स्वागत

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव महाविद्यालयात गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत झाले.

सकाळी 9 वाजता महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी सपत्नीक प्राणप्रतिष्ठा केली. महाविद्यालयाच्या एम.बी. ए, बी.बी.ए व बी. सी. ए च्या सर्व विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. महाविद्यालयामध्ये गणेशोत्सव सात दिवस साजरा करण्यात येणार असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांनी यावर्षी पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करून उत्कृष्ट देखावा व सजावट केली आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे कामकाज प्रा. वैजयंती असोदेकर यांनी केले. कोरोनानंतर सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा जोश दिसून येत होता. या कार्यक्रमास डॉ. निलीमा वारके यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content