गोदावरी फाऊंडेशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला अभिवादन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवार, ६ डिसेंबर रोजी गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे अभिवादन करण्यात आले.

गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन मार्ल्यापण केले. यावेळी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्वीकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले, अकाऊटंट किशोर झांबरे, आयटी विभागाचे किशोर साळी, शशिकांत तायडे, नर्सिग ऑफिसच्या मनिषा खरात, मिडीया विभागातील गायत्री कुलकर्णी यांच्यासह गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थीनींची उपस्थीती होती. यावेळी मान्यवरांनी बाबासाहेबांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा देवून अभिवादन केले.

Protected Content