जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | आज गोदावरी फाउंडेशनमध्ये श्री गणपती बाप्पाचे आगमन झाले. या आगमनाची सुरुवात गोदावरी समूहाचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ येथे पूजा करून केली.
यावेळी इंग्लिश स्कूल मधील चार हजार विद्यार्थ्यांना 4000 मोतीचूर लाडू प्रसाद म्हणून वाटण्यात आले.
या कार्यक्रमात इंग्लिश स्कूलच्या प्रिन्सिपल अनघा पाटील, रुची मॅडम, वर्षा मॅडम, अंकिता मॅडम, तसेच डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाच्या संयोगी नर्सिंग ऑफिसर डिवायना पवार, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.