गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी परिषदेची स्थापना

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  महाविद्यालयीन जीवनामध्ये स्टुडन्ट कौन्सिल विद्यार्थी परिषद हा एक अविभाज्य घटक म्हणून गणला जातो, कारण कौन्सिलच्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षक वृंद यांचे परस्पर संबंध अधिक चांगल्या पद्धतीने जोपासले जातात व विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये या स्टुडन्ट कौन्सिलचा मोलाचा वाटा असतो. याच अनुषंगाने गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये विविध शाखांचे स्टुडन्ट कौन्सिल स्थापनेच्या समारंभाचे आयोजन दिनांक ६ मार्च २०२३ ला करण्यात आले.

 

या कार्यक्रमात सकाळचे जर्नलिस्ट व धखछ चे प्रमुख श्री वैभव कुशारे हे उपस्थित होते. त्यांच्यासोबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता), प्रा.दीपक झांबरे (समन्वयक, तंत्रनिकेतन) व सर्व विभाग प्रमुख तसेच शिक्षक वर्ग आणि सर्व शाखांचे विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून झाली. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 

स्टुडन्ट कौन्सिल स्थापनेच्या समारंभात सर्व शाखांच्या कौन्सिलच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पदानुसार बॅचेसचे वाटप करून त्यांना गौरवान्वीत केले. तसेच सकाळ सत्राच्या सर्व प्रतिनिधींचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  त्यानंतर शाखा निहाय विद्यार्थी प्रेसिडेंट यांनी त्यांच्या विभागाच्या स्टुडन्ट कौन्सिलची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली व आगामी काळात त्यांच्या कौन्सिलच्या माध्यमातून करण्यात येणार्‍या कार्यक्रमाचा आढावा दिला. त्यामध्ये तेजल झोपे (उएड-), रोशनी पाटील(चएड-), भाग्यश्री मंडावडे (ढएड-), हर्षल परदेशी(एएड-) यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.त्यानंतर कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती असलेले श्री वैभव कुशारे त्यांनी स्टुडंट्स असोसिएशनचे कौतुक केले व सकाळ धखछ च्या उपक्रमाची माहिती दिली. विद्यार्थी दशेत असताना आपण सर्वांगीण विकास करणे गरजेचे आहे जेणेकरून आपण एक उत्तम लीडर होऊ शकतो. त्यांनी या गोष्टींशी निगडित असलेले उदाहरणांसहित विद्यार्थ्यांना हे पटवून दिले. त्याचप्रमाणे महाविद्यालयामध्ये अशा उपक्रमांना प्राधान्य दिलं जाते ही खूप महत्त्वाची बाब आहे असे त्यांनी नमूद केले.

 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी सांगितले की स्टूडेंट कौन्सिल समारंभा नंतर खर्‍या अर्थाने तुमच्यावर आता नवीन जबाबदार्‍या येतील व प्रत्येक जबाबदारी तुम्हाला समर्थपणे पार पाडायची आहे असे नमूद केले. स्टुडन्ट असोसिएशनच्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक करताना पुढे येणार्‍या सर्व समारंभाचे उत्कृष्ट नियोजन करून यशस्वी करण्याबद्दल आवाहन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्टुडन्ट कौन्सिलचे फॅकल्टी कॉर्डिनेटर प्रा. प्रवीण पाटील (चएड-),प्रा. शुभांगी तायडे(एएड-), प्रा. आर. व्ही. पाटील (ढएड-) व प्रा. निलेश चौधरी (उएड-)यांनी डॉ. नितीन भोळे (विभाग प्रमुख, बेसिक सायन्सेस अँड हुम्यानिटिज) यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केतकी टिकले व पूर्वेश बर्‍हाटे यांनी केले. आणि आभार प्रदर्शन दिव्या काळे या विद्यार्थिनीने केले.

Protected Content