जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथे इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल तर्फे इंटरप्रेनरशिप आणि इनोवेशन करिअर ऑप्शन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार, अधिष्ठाता प्रा. हेमंत इंगळे, तसेच आयआयसी कौन्सिलचे कन्व्हेनर प्रा. अतुल बर्हाटे हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी डॉ. डॅनियल सी (असिस्टंट प्रोफेसर, हिंदुस्तान इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स चेन्नई), हे प्रमुख प्रवक्ते म्हणून उपस्थित होते.
उद्योजकता व नवकल्पना या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य विजयकुमार यांनी उपस्थित सर्वांना उद्यमशीलता व नाविन्य यासंदर्भात प्रेरणादायक अशी माहिती दिली. तसेच या कार्यक्रमासाठी आयआयसी कौन्सिलचे व्हाईस प्रेसिडेंट प्रा.हेमंत इंगळे यांनी उपस्थित सर्वांना कौन्सिल बद्दल माहिती दिली. प्राध्यापक अतुल बर्हाटे यांनीही कौन्सिल विद्यार्थ्यांना कसे मदत करते याबद्दल संबोधित केले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता डॉ. डॅनियल सी. यांनी उद्योजकता आणि नवकल्पना – करिअर संधी या विषयावर बोलताना अतिशय चांगली असे उदाहरणे देऊन उपस्थितांना उद्योजकता ही कशी फायदेशीर होऊ शकते, तसेच त्यासोबत नाविन्यता असल्यास उद्योजकतेमध्ये पुढील भविष्यात विद्यार्थ्यांना व भावी उद्योजकांना नव कल्पनांचा कसा उपयोग होऊ शकतो हे पटवून दिले. तसेच डॉ. डॅनियल यांनी उद्योजक बनण्यासाठी नवनवीन कल्पना कशाप्रकारे शिकणे आणि त्यांचा उपयोग पुढील जीवनात कशाप्रकारे करावा, याबद्दल विविध बिंदूंवर सखोल चर्चा करून समजावले.
याप्रसंगी गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज मधील विद्यार्थी व शिक्षक वृंदांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथील आयआयसीचे प्रमुख कार्य हे महाविद्यालयात व बाहेरील परिसरात उद्योजकता आणि नवकल्पना यांना प्रोत्साहन देणे असा आहे. याच प्रकारे गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग हे आयआयसी सोबत नवनवीन कार्यक्रम हे आयोजित करत असते, ज्याचा मुख्य उद्देश हा विद्यालयातील विद्यार्थ्यांना तसेच प्राध्यापक वृंदांना फक्त नोकरी न करता एक चांगला उद्योजक कसे होता येईल याबद्दलचे मार्गदर्शन करणे, तसेच त्यासाठी हव्या असलेल्या फॅसिलिटीज उपलब्ध करून देणे असून केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन सोबत आखून दिलेल्या कृती आराखड्यानुसार कार्य करणे हा आहे.वरील कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ललिता पाटील यांनी केले, कार्यक्रमाचे ऑनलाईन बांधणी हे प्रा. प्रशांत शिंपी यांनी केले आणि कार्यक्रमाचे व्यवस्थापन हे प्रा.महेश पाटील यांनी केले