पहूर ता.जामनेर (प्रतिनिधी)। जामनेर तालुक्यातील गोंदेगाव शेत शिवारात बेकायदेशीर देशी हातभट्टी पहूर पोलिसांनी उद्ध्वस्त करून दारू व दारू बनविण्याचे रसायन नष्ट करण्यात आले. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील गोंदेगाव येथील शेत शिवारात बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू बनविण्यात असल्याची माहिती पहूर पोलिसांनी मिळाली. त्यानुसार सपोनि राकेशसिंह परदेशी यांच्या पोलीस पथक पोलीस नाईक राठोड, पो.कॉ. जितू परदेशी, वाहन चालक संजय सोनवणे यांनी शनिवारी सायंकाळी गोंदेगाव शिवारात जावून गावठी हातभट्टी सुरू असतांना संशयित आरोपी सत्तार शब्बीर तडवी यांच्या ताब्यातील तीन टाक्या २०० लीटर प्रमाणे कच्चेरसायन नष्ट करण्यात आले तर साडेसात हजार रूपयांची तयार दारू हस्तगत केली. संशयित आरोपीविरोधात पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.