जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील गोंडखेड गावात घराजवळील गटारीतील पाण्याच्या किरकोळ कारणावरून तरूणाला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना गुरूवारी २ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता घडली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, भिकन अब्बास तडवी (वय-३६) रा. गोंडखेड ता.जामनेर हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरूवार २ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्याच्या घरासमोरील गटारीतील पाण्याच्या किरकोळ कारणावरून गावात राहणारा जलाल उमराव तडवी आणि उमराव अमीर तडवी यांनी भिकन याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच दोघांनी भिकन तडवी याला जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुरूवार २ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात भिकन तडवी यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी जलाल उमराव तडवी आणि उमराव अमीर तडवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ साहिल तडवी करीत आहे.