नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ६५,००२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ९९६ जणांचा मृत्यू झाला आहे.
भारतात कोरोनाचा धोका वाढत असून दररोज रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठणारी आकडेवारी समोर येत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल २५ लाखांच्या वर गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६५,००२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ९९६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ६५,२६,१९३ वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ४९,०३६ वर पोहोचला आहे. देशात कोरोनाचा धोका वाढला असून गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. दरम्यान, देशातील कोरोनाग्रस्तांपैकी ६,६८,२२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १८,०८,९३७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.