जळगाव प्रतिनिधी । गेंदालाल मिल परिसरातील राहणारे दिपक सपकाळे यांनी घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपले असता अज्ञात चोरट्यांनी घरातील रोकडसह सोन्याचे दागिन्यांसह २३ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना गुरूवारी सकाळी उघडकीला आला. याप्रकरणी रात्री उशीरा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, दिपक जगन्नाथ सपकाळे (वय-२९) रा. गेंदालाल मिल हे खासगी नोकरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. १७ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता जेवण करून सर्व जण झोपले. त्यावेळी त्यांनी घराचा पुढील दरवाजा उघडा ठेवला होता. याचा फायदा घेवून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरात ठेवलेले ६ हजार रूपये किंमतीचा मोबाईल, ९ हजार किंमतीचे तीन ग्रॅम वजनाचे सोने आणि ८ हजार रूपये रोख असा एकुण २३ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार सकाळी ५ वाजेच्या सुमारास दिपक सपकाळे यांच्या लक्षात आला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ बाशीर तडवी करीत आहे.