चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील वर्डी येथील तीन युवक गुळी नदीत पोहण्यासाठी उतरले असता त्यातील दोघे वाहून गेले असून एक मात्र सुदैवाने बचावला आहे.
सध्या गूळ प्रकल्पातून आवर्तन मिळाल्याने गुळी नदीच्या पात्रात पाणी आलेले आहे. दरम्यान, तालुक्यातील वर्डी येथील तीन युवक गुळी नदीत रविवारी सायंकाळी पोहण्यासाठी उतरले. यातील सिद्धार्थ शिवाजी साळुंके व दिलीप केशव ढिवरे (रा. जयभीमनगर, वर्डी) हे दोघे हे पाण्याच्या डोहात बुडाले. तर विनोद कांबळे (वय २२) हा मात्र काठावर असल्याने बचावला. त्याने ही माहिती पोलीसांना दिली. रात्री उशीरापर्यंत या दोन्ही तरूणांचा शोध घेण्यात आला असला तरी ते आढळून आले नाहीत.