Home Cities जळगाव गुरूपौर्णिमानिमित्त हरीविठ्ठल नगरात वृक्षारोपण

गुरूपौर्णिमानिमित्त हरीविठ्ठल नगरात वृक्षारोपण


जळगाव प्रतिनिधी । शहरातील व्यंकटेश कॉलनी व हरीविठ्ठल नगरात गुरूपौर्णीमा निमित्त श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान, एकता बहुउद्देशीय महिला मंडळ आणि सर्वज्ञ बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यामानाने आज शुक्रवार २३ जुलै रोजी सकाळी १० वाजता वृक्षारोपण करण्यात आले. 

याप्रसंगी गुरूपौर्णिमाचे महत्व सांगून गुरू व शिष्य यांची माहिती सुचित्रा महाजन यांनी दिली व मागर्दर्शन केले. याप्रसंगी अंकिता वारुळे, सुनीता बाविस्कर, उज्वला कुलकर्णी, कुसुम दायमा, सुनील दाभाडे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. गुलशन बेलदार यांनी मनोगत व्यक्त केले. मी मराठी प्रतिष्ठानचे राहुल परकाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे नियोजन एकता बहुउद्देशीय महिला मंडळ कल्पना पाटील, श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान चे अध्यक्ष दीपक दाभाडे, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे सदस्य सुरज दायमा, दीपक ठाकूर, तुकाराम महाजन, एल.बी. महिरे, संदीप दाभाडे, युवराज पारदे, रावसाहेब देवरे, जितेंद्र दाभाडे, राजू तडवी, गोपाल राजपूत, सागर ठाकुर, विशाल साळुंखे यांनी केले. 

 


Protected Content

Play sound