जळगाव प्रतिनिधी । शहरातील गुरूनानक नगरात राहणारे ६० वर्षीय व्यक्ती कामावर जात असल्याचे सांगून बेपत्ता झाले आहे. पत्नीच्या खबरीवरून शनीपेठ पोलीसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेमचंद कुंजीलाल आचार्य (वय-६०) रा. गुरूनानक नगर मोची वाडा जळगाव हे खासगी कंपनीत कामाला आहे. ते कांचननगरात पत्नी रेखा, मुलगा आकाशसह राहतात. नेहमीप्रमाणे २० फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास कामाला जातो असे सांगून ते घराबाहेर पडले. आज सकाळपर्यंत घरी न असल्याने कामाच्या ठिकाणी शोधाशोध केली. परंतू आढळून आले नाही. पत्नी रेखा आचार्य यांच्या खबरीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.