गुजरातला आज मुख्यमंत्री मिळण्याची शक्यता : भाजपची महत्वाची बैठक

गांधीनगर वृत्तसंस्था | गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर आज पक्षाची बैठक होत असून यात नवीन मुख्यमंत्र्याचे नाव जाहीर करण्यात येईल अशी अपेक्षा आहे.

 

काल गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आकस्मीकपणे आपल्या पदाचा राजीनामा दिला. रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता गुजरात कोणाच्या हातात असेल याबाबत निर्णय आज घेण्यात येणार आहे. नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी गुजरात भाजपा विधिमंडळ पक्षाची रविवारी बैठक होण्याची शक्यता आहे.

विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी गुजरात भाजप विधिमंडळ पक्षाची रविवारी बैठक होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाचे राज्य प्रवक्ते यमल व्यास यांनी सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय निरीक्षकांसह विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहू शकतात. काही केंद्रीय मंत्री गुजरातच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सहभागी असल्याचेही म्हटले जात आहे.

 

दरम्यान, विजय रूपाणी यांच्या जागेवर उपमुख्यमंत्री नितीन पटेल, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय, पुरुषोत्तम रुपाला, प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांची नावे चर्चेत आहेत. तर एखाद्या वेळेस मोदी आणि शाह हे धक्कातंत्राचा वापर करून नवीन नाव समोर करण्याची शक्यता आहे.

Protected Content