गांधीनगर (वृत्तसंस्था) गुजरातमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी येत्या २६ मार्चला होणाऱ्या मतदानापूर्वी काँग्रेसच्या ५ आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.
मध्यप्रदेशमध्ये देखील कॉंग्रेसच्या २१ आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे कॉंग्रेस अल्पमतात आली आहे. दुसरीकडे आज रविवारी काँग्रेसचे ५ आमदार प्रवीण मारू, मंगल गावित, सोमाभाई पटेल, जेवी काकड़िया आणि प्रद्युम्न जडेजा यांनी राजीनामा दिला आहे. आमदारांची पळापळ होण्याची शक्यता पाहता काँग्रेसकडून १४ आमदारांना अगोदरच जयपूरला पाठवण्यात आलं आहे. तर, आता आणखी ३६ आमदारांना देखील राजस्थानला पाठवले जाऊ शकते. दरम्यान, सर्व आमदारांना मोबाईल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.