गुजरातमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची मदतीची हाक

जळगाव प्रतिनिधी । सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने गुजरात राज्यात अडकून पडलेल्या ६२ मराठी प्रशिक्षणार्थींनी आपल्याला घरी सुखरूप परत जाऊ द्यावे अशी आर्त हाक दिली आहे.

याबाबत वृत्त असे की, राज्यातील ६२ विद्यार्थी हे प्रशिक्षणार्थी म्हणून गुजरातमध्ये गेले असून ते लॉकडाऊनमुळे तिकडेच अडकून पडले आहेत. हे सर्व विद्यार्थी राधनपूर रेल्वे स्थानकाजवळ असणार्‍या प्रशिक्षण केंद्रात अडकून पडले आहेत. यात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांच्या प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाला असून आता भोजनासह जीवनावश्यक वस्तू मिळण्यात खूप अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. यातच लॉकडाऊन नेमका केव्हा संपणार याची काहीही शाश्‍वती राहिलेली नाही. यामुळे या प्रशिक्षणार्थींनी महाराष्ट्र व गुजरात या दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींना मदतीची हाक दिली आहे.

Protected Content