अमळनेर- लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | सध्या सोशल माध्यमांनी संपूर्ण जगावर ताबा मिळवला असून अमळनेर येथील मंगळग्रहच्या मंदिराला तब्बल ३० हजार भाविकांनी गुगलवर जाऊन शोधले आहे.
आजच्या या धावपळीच्या युगात प्रत्येकाच्या खिशात स्मार्ट फोन असल्याने आता जग फार जवळ आल्यासारख वाटतंय. कोणतीही माहिती क्षणार्धात मोबाईलच्या माध्यमातून गुगलवर उपलब्ध होते. अशीच एक माहिती विश्वातील एकमेव अति दुर्मिळ, अति प्राचीन व अति जागृत असलेल्या अमळनेर येथील श्री मंगळ ग्रह मंदिराची माहिती गत महिन्याभरात ३० हजार भाविकांनी शोधली. विशेष म्हणजे केवळ शोधली नाहीत तर मंदिरात येऊन गेलेल्या भाविकांनी आपला अभिप्राय, प्रतिक्रिया तसेच मत देखील मंदिराच्या संकेतस्थळावर नोंदविले आहे. पुजेला येण्याची वेळ, ऑनलाइन अभिषेक बुकिंग, इतर प्रश्न शेअर केल्यात. मंदिर प्रशासनाने ही तत्परतेने भाविकांनी विचारल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिल्याने मंदिराच्या संकेतस्थळाचा व्ह्यू वाढला. त्यामुळे गुगुलने देखील दखल घेत नुकतेच श्री मंगळ ग्रह मंदिराच्या संकेतस्थळाला ४.६ रँक (रिव्ह्यू) असलेले डिजिटल प्रमाणात दिले आहे.