नागपूर : वृत्तसंस्था । जास्त व्याजाचे आमिष दाखवून नागपुरात ३५ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या या कंपनीचे नाव एजीएम कॅार्पोरेशन डिजीटल ॲडव्हटाईजमेंट असं कंपनीच्या तीन संचालकांविरोधात सीताबर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
एजीएम कॅार्पोरेशन डिजीटल ॲडव्हटाईजमेंट या कंपनीने जास्त व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सुनील कोल्हे, पंकज कोल्हे आणि भरत शाहू अशी आरोपी संचालकांची नावं आहेत. या तीन संचालकांनी गुंतवणूकदारांना आकर्षक व्याज आणि बोनसचे आमिष दाखवून आकर्षित केले. त्यामुळे मोठे व्यापारी, उद्योजक आणि नोकरदारांनी या कंपनीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली.
मात्र, गुंतवणूकदारांना पैसे परत न करता या संचालकांनी पळ काढला. ही बाब गुतंवणूकदारांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. या विरोधात सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.