चाळीसगाव प्रतिनिधी । गिरणा परिसर व्हाटसअॅप ग्रुपतर्फे तालुक्यातील वर्तमानपत्र विक्रेते व अन्य असंघटीत श्रमिकांना सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले.
अमोल सोनार संचलित गिरणा परिसर वॉट्स ग्रुपच्या वतीने नुकतेच चाळीसगाव तालुक्यातील सर्व वर्तमानपत्र विक्रेते तसेच पेपर वाटप करणारे असंघटित श्रमिक बांधव यांना आज सेनेटायझर व मास्कचे वाटप उमंग महिला समाज शिल्पी परिवाराच्या अध्यक्षा संपदाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. चाळीसगाव न्युज पेपर एजन्सीजचे चंद्रकांत कांकरिया,पत्रकार भिकन वाणी, जेष्ठ पेपर विक्रेते सुभाष अमृतकर, मधुकर गुंजाळ यांच्यासह तालुक्यातील सर्व पेपर विक्रेते आदी मान्यवर उपस्थित होते. उमंग परिवाराच्या संपदाताई पाटील यांनी यावेळी गिरणा परिसर व्हाटसअॅप ग्रुप सदस्यांचे अभिनंदन करीत तरुणांनी आदर्श घ्यावा असा उपक्रम घेतल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले.
यावेळी ग्रुप च्या वतीने पिलखोड येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस पिलखोड ग्रामपंचायत कर्मचारी ,शासकीय केंद्रातील डॉक्टर त्यांचे सहकारी, शिरसगाव, चाळीसगाव फाटा ते मालेगाव फाटा पर्यंत बंदोबस्तासाठी उपस्थित पोलीस बांधव व पिलखोड येथील दक्षता घेणारे कार्यकर्ते रामराज्य ग्रुप या सर्वाना गिरणा परिसर व्हाट्सअप ग्रुप तर्फे सेनीटायझर व मास्क वाटप करण्यात आले. जागोजागी कोरोना व्हायरस जनजागृती करण्यात आली. गिरणा परिसर व्हाटसअॅप ग्रुप यांनी निराधार नागरिकांना धान्य व जीवनावश्यक वस्तू वाटप व इतर मदत केल्याबद्दल केंद्रीय पेट्रोलियम प्राकृतिक गॅस व सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टँडिंग कमिटी सदस्य तथा खासदार उन्मेशदादा पाटील यांनी या ग्रुपचे कौतुक केले व ग्रुपला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सिग्नल चौकातील कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचारी बांधवाना सेनेटायझर व मास्क वाटप करण्यात आले,तसेच पोलीस बांधव चोवीस तास सेवा देत असल्याबद्दल पोलीस बांधवांचे आभार मानण्यात आले. या उपक्रमासाठी विजय पाटिल, संदीप वाघ, सतीश सोनावणे, महेश कपडने, मयुर मोरे, कैलास भाऊ, अतुल शिरसाठ, योगेश पाटिल, धनंजय पाटिल, लखन परदेशी, शुभम पाटिल ,आकाश पाटिल, जगदीश पाटिल, अमोल सोनार यांनी परिश्रम घेतले